जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर (Terrorist) भारताने आक्रमक पवित्रा घेतला आहे. हा हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना शोधू काढण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. असं असतानाच आता भारतीय सैन्याने दहशतवाद्यांची एक यादीच केली आहे. त्यामुळे आता भारतीय सैन्य लवकरच मोठी कारवाई कारवाई करण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) सध्या एकूण 14 दहशतवादी सक्रीय आहेत. भारतीय सेनेने या दहशतवाद्यांची संपूर्ण माहिती मिळवलेली आहे. याच माहितीनुसार सोपोर भागात लष्कर ए तोयबाचा एक स्थानिक दहशतवादी येथे सक्रीय आहे. याच यादीनुसार अवंतीपुरा या भागात जैस ए मोहोम्मद या दहशतवादी संगटनेचा एक दहसतवादी सक्रीय आहे. पुलवामामध्ये जैश ए मुहम्मद आणि लष्कर ए तोयबा या दोन्ही दहशतवादी संघटनांचे प्रत्येकी दोन दहशतवादी सक्रीय आहेत.
सोफीयान या भागातही हिजबूलचा एक आणि लष्कर ए तोयबाचे चार, तर अनंतनागमध्ये हिजबूलचचे दोन स्थानिक दहशतवादी सक्रीय आहेत. गुलमाम या भागातही लष्कर ए तोयबाचा एक स्थानिक दहशतवादी सध्या सक्रीय आहे. या सर्वच दहशतवाद्यांची माहिती भारतीय सेनेने काढली आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांचं काय होणार? याकडे सर्वांचच लक्ष असणार आहे.