Thursday, June 19, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचं लोकार्पण

संपूर्ण ७०१ किमी मार्ग लोकांच्या सेवेत दाखल

नागपूर (Nagpur) :– मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी ते आमणे या ७६ किमी लांबीच्या चौथ्या व शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण आज (गुरुवार, ५ जून) रोजी पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते या महामार्गाचं लोकार्पण झालं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कॅबिनेटमधील इतर मंत्री व अधिकारी उपस्थित होते. इगतपुरी येथील बोगद्यातील उत्तरेकडील मार्गिकेवर लोकार्पणाचा मोठा सोहळा पार पडला. लोकार्पणाआधी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कारने या बोगद्यातून प्रवास केला.

समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Highway) शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण झाल्याने संपूर्ण ७०१ किमी लांबीचा रस्ता वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. त्यामुळे आता नागपूर – मुंबई प्रवास १६ तासांऐवजी आठ तासांत पूर्ण करता येणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) ठाणे खाडी पूल-३ प्रकल्पातील दक्षिणेकडील अर्थात पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेचे लोकार्पणही पार पडले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या मार्गिकेचं लोकार्पण केलं. या मार्गामुळे पुणे-मुंबई प्रवास अधिक सुकर होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles