Sunday, August 10, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

रेल्वेत सापडली हंडरेड पाईपर्स अन् ओल्ड मंक! विदेशी आणि देशी दारूचा मोठा साठा जप्त

नागपूर (Nagpur) : रेल्वे  सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) नागपूर आणि चंद्रपूर पथकाने विदेशी आणि देशी दारूचा मोठा साठा जप्त केला. नागपुरात हंडरेड पाईपर्ससह ओल्ड मंकच्या बाटल्या आढळल्या. तर, चंद्रपूर रेल्वे यार्डमध्ये रॉकेट देशी दारू जप्त करण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून आरपीएफच्या नार्कोटिक्स टीमकडून ठिकठिकाणी ऑपरेशन सतर्क अधिक तेज करण्यात आले आहे. नागपूरच्या पथकातील रवींद्र जोशी, आशिष कुमार आणि कविता कुपाले हे आज सकाळी नागपूर स्थानकावर गस्त करीत होते. ट्रेन नंबर १२६१६ जीटी एक्सप्रेस सकाळी १०.५२ वाजता फलाट क्रमांक २ वर आली असता त्यांनी गाडीची तपासणी सुरू केली. कोच नंबर ४ च्या ५७ नंबरच्या बर्थखाली त्यांना एक बॅग आढळली. या बॅग धारकाला ताब्यात घेऊन बॅगची तपासणी केली असता त्यात १०० पाईपर्सच्या ७५० मिलिच्या ५ बाटल्या (किंमत १२ हजार) आणि ओल्ड मंकच्या ७५० च्या १५ बाटल्या आढळल्या. त्या जप्त करून आरपीएफने मुंबई दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा नोंदवला. त्यानंतर आरोपी तसेच दारूच्या बाटल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सोपविल्या. दुसरी कारवाई चंद्रपूरच्या रेल्वे यार्डमध्ये करण्यात आली. नागपूर रेल्वे लाईनजवळ आरपीएफच्या पथकाला एक बेेवारस बॅग आढळली. या बॅगची तपासणी केली असता त्यात रॉकेट नामक देशी दारूचे ३०० पाऊच आढळले. १०,५०० रुपये किंमतीची ही दारू जप्त करण्यात आली.

Nagpur is famous for 
NMC Nagpur
Nagpur direction
Nagpur map
Nagpur News
nagpur.gov.in recruitment
Where is Nagpur in which state
Nagpur distance

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles