Monday, June 23, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

नगर शहरातील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाईचा आयुक्तांचा इशारा

अहमदनगर:  अहमदनगर महानगरपालिका हद्दीमध्ये उभारण्यात आलेल्या अनाधिकृत होर्डिंग वर कारवाई होणार आहे.तसेच परवानगी घेण्यात आलेल्या होर्डिंगचे पाच दिवसांमध्ये स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट सादर करण्याचे आदेश आयुक्तां नी दिले आहेत.स्ट्रक्चरल ऑडिट चे कागदपत्र सादर न केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे यांनी दिला

नुकतेच मुंबईतील घाटकोपर येथे येथे झालेल्या होर्डिंग दुर्घटने नंतर मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी तातडीने आदेश काढत होर्डिंग वर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.शहरात विविध भागांमध्ये अनधिकृत होर्डिंग आहेत.तसेच स्ट्रक्चरल ऑडिट न झाल्यामुळे एखादी दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी अधिकाऱ्यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.शासना च्या निर्देशानुसार महापालिकेने तातडीने होर्डिंग मालकाची बैठक घेऊन सूचना देत कागदपत्राची पूर्तता करावी अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा यावेळी दिला.मनपा आयुक्तांनी एक समिती नेमली असून त्या समिती द्वारे शहरातील अनधिकृत व अधिकृत होर्डिंगची पाहणी करण्यात येत आहे तसेच या पाहाणी बाबतचा अहवाल तातडीने सदर करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles