Thursday, August 7, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

पाकिस्तान प्रॉक्सी वॉर करतं हा इतिहास; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य

मुंबई (Mumbai) :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील त्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि संरक्षण दल यांच्यामध्ये ‘नागरिक-सैन्य समन्वय’ बैठक संपन्न झाली. या बैठकीत गुप्तचर माहितीचे आदानप्रदान, तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर आणि आवश्यक खबरदारी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

नागरी सुरक्षेच्या संदर्भात एक बैठक आपण घेतली होती. कारण या संपूर्ण युद्धजन्य परिस्थितीत महाराष्ट्र  (Chief Minister Devendra Fadnavis) शासनाच्या विविध विभागांची बैठक आपण घेतली होती. तसंच आपलं जे सेनादल आहे त्याच्या अधिकाऱ्यांशी थेट बैठक घेतली नव्हती. आज जी बैठक घेतली ती या दिवसांमध्ये जो अनुभव आला त्यातून अधिक काय करायचं? आपली दिशा कशी असली पाहिजे आणि कशी सावधगिरी बाळगली पाहिजे या दृष्टीने सैन्य दलाच्या अपेक्षा समजून घेतल्या. जी काळजी वाटते ती आम्ही सांगितली.

आपल्या सैन्याने पाकिस्तानला त्याची जागा दाखवली. आपल्या सेनेने पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई केली आणि दशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले, पाकिस्तानला माहीत आहे की भारताविरोधात आपण लढू शकत नाही. असं झालं की पाकिस्तानकडून प्रॉक्सी वॉर सुरु करतात. मुंबईच्या दृष्टीने काय खबरदारी घेतली पाहिजे यासाठी आजची बैठक केली आहे. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles