नागपूर: गुरुवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास नागपूर जिल्ह्यातील हिंगणा एमआयडीसीमध्ये वर्षा इंक या पेनाच्या शाई उत्पादक कंपनीला आग लागल्याची घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. आग इतकी तीव्र होती की, धुराचे लोट आकाशात दिसत होते.आग लागण्याची कारणे अद्याप स्पष्ट झाली नाहीत. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्नांनी आग नियंत्रित करण्यात यश मिळवले.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.आग लागल्यामुळे कंपनीला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान ही कंपनी मागील काही दिवसांपासून बंद असल्याची माहिती आहे. आगीमागे कोणताही संशयास्पद (Suspicious)हात आहे का याची चौकशी सुरू आहे.