Sunday, June 22, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

हेमंत सोरेन यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना त्यांच्या अंतरिम जामीन अर्जावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. आता अंतरिम जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. हेमंत सोरेन यांनी निवडणूक प्रचारासाठी जामीन मागितला आहे. त्यावर मंगळवारी सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले.

उन्हाळी सुट्टीतील अवकाशकालीन खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. बहुधा हे प्रकरण न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी येईल कारण न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी स्पष्ट केले की, दोन न्यायाधीशांपैकी एक न्यायमूर्ती त्या खंडपीठावर राहणार आहे.न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने ईडीचे वकील एएसजी एसव्ही राजू यांना सांगितले की, हा अर्ज निवडणूक प्रचारासाठी अंतरिम जामिनासाठी आहे. तुमची भूमिका काय आहे ? यावर राजू यांनी आक्षेप घेतला.

सोरेन यांचे वकील कपिल सिब्बल यांनी सांगितले की झारखंडमध्ये 20 आणि 25 मे रोजी मतदान आहे. न्या. खन्ना यांनी सिब्बल यांना जमिनीच्या ताब्याबद्दल विचारले असता, त्यांनी सांगितले की ती कधीही ताब्यात नव्हती. याप्रकरणी हेमंत सोरेन यांनी आपल्या अटकेला आव्हान दिले असून अंतरिम जामिनाचीही मागणी केली आहे. केजरीवाल यांच्याप्रमाणेच सोरेन यांनीही अंतरिम जामीन मागितला आहे जेणेकरून ते लोकसभा निवडणुकीत प्रचार करू शकतील.

गेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ईडीला नोटीस बजावून उत्तर मागितले होते. ईडीच्या वतीने, एएसजी एसव्ही राजू यांनी सोरेनला अंतरिम जामीन देण्यास विरोध केला आणि म्हटले की ही अटक निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच झाली होती. सोरेन यांचे वकील कपिल सिब्बल म्हणाले की, जमीन घोटाळ्याचा आरोप काही लोकांच्या वक्तव्याच्या आधारे करण्यात आला आहे, तर माझ्याकडे जमिनीचा कोणताही ताबा नाही. आता ईडी सोमवारपर्यंत उत्तर दाखल करेल आणि अवकाशकालीन खंडपीठ मंगळवारी 21 मे रोजी त्यावर सुनावणी करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles