Monday, June 23, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

हरकूळच्या नुकसानग्रस्त भागाची आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी

सिंधुदुर्ग : गुरुवारी सायंकाळी झालेल्या वादळी वारे आणि पावसाचा कणकवली तालुक्यातील हरकूळ गावाला मोठा फटका बसला आहे. अनेक घरांचे छप्पर उडाले तर अनेक घरांवर झाडे कोसळून नुकसान झाले आहे. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक आणि शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी आज सकाळी हरकूळ गावातील शेखवाडी, खडकवाडी, कांबळीवाडी येथे भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. पंचनाम्यांची माहिती घेतली.

यावेळी आ. वैभव नाईक यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याशी फोनवर चर्चा करत नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळवून देण्याच्या सूचना दिल्या. तसेच झाडे कोसळल्याने विद्युत पोल आणि वीज वाहिन्या तुटून वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे, याबाबत आ. वैभव नाईक सतीश सावंत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून लवकरात लवकर विज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी हरकूळ सरपंच बंडू ठाकूर, नित्यानंद चिंदरकर, राजू पावसकर, अमेय ठाकूर, हनीफ शेख आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles