डोंबिवली, ३ जुलै :- अनाथांचा नाथ आणि वैद्यकीय गरजू लोकांच्या मदतीसाठी तात्काळ धावून जाणारे डोंबिवलीतील प्रल्हाद परशुराम म्हात्रे सध्या अनोख्या चर्चेत आहेत. म्हात्रे यांच्या नव्या ओळखीने त्यांच्या चाहत्यांची छाती फुगून आली आहे. सोशल मीडियावर आता गीतकार म्हणून म्हात्रे त्यांचे अभिनंदन होत आहे. त्याला कारणच तसेच भरीव आहे. प्रल्हाद म्हात्रे यांनी आषाढीवारी निमित्ताने चला की धनी पंढरीला या भक्तीगीताची गीतरचना केली आहे. मुख्य म्हणजे सुप्रसिद्ध गायक स्वर्गीय प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं ”चल ग सखे पंढरीला” या गाण्याच्या धर्तीवर लाजबाबब अशी काव्यरचना चला की धनी पंढरीला या गीताची आहे. या गीतातूनही म्हात्रे यांनी मनुष्य जीवनातील कर्तव्ये आणि माणुसकीची जपणूक यावर प्रकाशज्योत टाकला आहे.
प्रल्हाद म्हात्रे यांनी माऊलींच्या कृपेने पालखीसोबत आळंदीहून पंढरपूर अशा तीन वाऱ्या केल्या आहेत. त्यात एक परतीची वारी सुद्धा त्यांनी केली आहे. मात्र या वर्षी प्रकृती अस्वास्थामुळे ते जाऊ शकले नाहीत. याचे त्यांना मनस्वी दुःख होत आहे. म्हणूनच वारीची उणीव भरून काढण्यासाठी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक स्वर्गीय प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं ”चल ग सखे पंढरीला” या गाण्याच्या धर्तीवर माऊलीकृपेने त्यांनी ”चला की धनी पंढरीला” या भक्तीगीताची भावपूर्ण रचना केली आहे.
याबाबत गीतकार प्रल्हाद म्हात्रे म्हणतात, जुन्या गाण्यात पती आपल्या पत्नीला ”चल ग सखे पंढरीला” म्हणून उपदेश करीत आहे तर म्हात्रे यांच्या गीतातून पत्नी आपल्या पतीला ”चला की धनी पंढरीला” असं साकडे घालीत आहे. दोन्ही गाण्याचा भावार्थ वेगवेगळा आहे. गाण्याची चाल मात्र जुनीच आहे. हे गाणं सुप्रसिद्ध गायिका ”टाईमपास” सिनेमातील ”ही पोळी साजूक तुपातली, तिला म्हावऱ्याचा लागलाय नाद…” या सुप्रसिद्ध गाण्याची मुख्य गायिका रेश्मा सोनावणे यांनी गायलं आहे.
प्रल्हाद म्हात्रे यांचा सामाजिक बांधिलकी जपाण्यावर ओढा असून त्यांनी आजपर्यंत अनेकांना मदतीचा हात दिला आहे. जेष्ठ अनाथ नागरिकांचे ते पालक म्हणून कार्य करीत आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना सतत मदतीचा हातभार लावतात. अनाथ मुलींच्या विवाहाची जबाबदारी त्यांनी पेलली आहे. तरुणांनी मैदानीखेळ खेळलेच पाहिजे यासाठी मैदानाच्या देखभालिसाठी स्वतः आर्थिक भाल सोसतात. आता तर कलाक्षेत्रातही म्हात्रे यांची गीतकार म्हणून वेगळी ओळख त्यांच्या चाहत्यांना होत आहे.
या गीताचे व्हिडीओ चित्रीकरण करणारे सागर सुमित्रा सुरेश पांचाळ सांगतात, प्रल्हाद म्हात्रे यांनी रचलेलं ”चला की धनी पंढरीला” हे भक्तीगीत सुप्रसिद्ध गायिका रेश्मा सोनावणे यांच्या आवाजात स्वरबद्ध करून मला त्या गाण्याचे चित्रीकरण करण्याची संधी मिळाली. म्हात्रे यांनी या गाण्यातील शब्दाशब्दाला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी एक एक व्हिडिओ, फोटो शोधून माझ्याकडून चित्रीकरण करून घेतले. म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या गाण्यासाठी चित्रीकरण करताना मला त्यांचे विचार, त्यांची पद्धत, त्यांची दूरदृष्टी आत्मसात करता आली. तसेच त्यांचा सहवास आणि स्पष्ट