Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

Gondia : पीठ गिरणीत ओढणी अटकून महिलेचा मृत्यू

गोंदिया २९ जून :- अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथे पिठगिरणी मशीनच्या पट्यात गळ्यातील ओढणी अडकुन एका 45 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यु झाला असुन पिठगिरणी मशीनच्या पट्यात ओढणी अडकल्याने महिलेचा शिर कापला गेला आणि शरीरापासुन वेगळा झाल्याची घटना घडली. या घटनेत महिलेच्या दुर्दैवी मृत्यू झाला, घटनेमुळे नवेगावबांध परिसरात एकच खळबळ उडाली.

आझाद चौकातील हर्षल उजवने यांच्या पिठगिरणीत शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजताच्या दरम्यान .नीतु उजवने रा.नवेगाव/बांध ह्या नेहमीप्रमाणे पिठगिरणी वरती ग्राहकाचा दळण पिसण्यासाठी दळण पिठगिरणी मशीन मध्ये टाकत असतांना त्यांच्या गळ्यातील ओढणी पिठगिरणी मशीनच्या पट्यात अडकली आणि त्यामुळे त्यांच डोक पिठगिरणी मशीनच्या चाकाला अडकुन शरीरापासुन वेगळा झाला आणि त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यु झाला. पिठगिरणी मशीन मध्ये झालेल्या अपघाताने नवेगाव बांध गावात एकच खळबळ उडाली असुन उजवने परिवारांवरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles