गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात तिरोडा तालुक्यामधील पालडोंगरी येथे शेत जमीनीतून गेल इंडिया कंपनीच्या पाईपलाईन टाकण्यात आलीय. तसेच शेतकऱ्यांना पोलिसांच्या मदतीने हुसकावून लावले जातेय. या बळजबरी विरोधात शेतकऱ्यांनी कुटुंबासह इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे.
पालडोंगरीत गेल इंडिया कंपनीची पाईप लाईन टाकण्याचं काम सुरू आहे. ही पाइपलाइन शेतकऱ्यांचा शेतातून टाकली आहे. तर याच कंपनीचा सबस्टेशन तयार करण्यासाठी तिरोडा तालुक्यातील (Tiroda forest) पालडोंगरी येथिल गेंदलाल बोपचे यांचं शेत बळजबरीने हिसकावण्याचा काम कंपनी करत आहे. गेंदलाल बोपचे, चींदु बोपचे हे दोघे भावंड असून यांच्याकडे वडिलोपार्जित पावणे चार एकर शेती आहे. याच शेती बाराही महीने राब राब राबून आपल्या परीवरांचा पोट भरतात. मात्र आता गेल इंडिया कंपनी त्यांच्या शेतात बळजबरीने सब स्टेशन तयार करण्यासाठी दीड एकर जमीन अधिग्रहण करत आहे. पण बोपचे यांना ती जमीन विकायची नाही. ज्या काळ्या आईने आजपर्यंत त्यांच्या पोट भरला तिला विकून ते रस्त्यावर येथील म्हणुन त्यांनी विरोध केला. पण कंपनीने बळजबरीने जमीन मोजमाप करण्यासाठी पोलिस प्रशासन सोबत घेत शेतकरयांना त्यांच्याच शेतातून बळजबरीने बाहेर काढले. जणू हे शेतकरी नसून आरोपी आहेत अशी वागणूक पोलिसांनी शेतकऱ्यांना दिली. शेतकरी कुटुंबात 12 सद्स्य असुन इच्छा मरणाची परवानगी जिल्हाधिकारी यांना मागीतली आहे. पोलीसांच्या कारवाहीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे.