Thursday, July 31, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले”, लोणीकरांच्या वक्तव्यावर फडणवीस नाराज

भाजपाचे (BJP) परतूरचे आमदार व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलेल्या एका वक्तव्यावर राज्यभरातून टीका होऊ लागली आहे. मतदारसंघातील एका गावात केलेल्या भाषणात लोणीकरांनी त्यांच्या टीकाकारांवर हल्लाबोल केला. “तुझ्या बापाला पेरणीचे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. तुझ्या आईला, बहिणीला व बायकोला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आम्ही पैसे देतो. तुमच्या अंगावरचे कपडे, बूट व चपला आहेत त्या आम्हीच दिल्या आहेत”, असं वक्तव्य लोणीकर यांनी केलं होतं. यावर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. अनेक विरोधी पक्षांनी लोणीकरांवर टीका करत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

दरम्यान, जनतेचा संताप व विरोधकांची टीका पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बबनराव लोणीकरांना समज देऊ असं वक्तव्य केलं आहे. लोणीकरांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी (prime Minister Nartendra Modi) हे स्वतःला देशाचे प्रधानसेवक म्हणतात. आम्ही जनतेचे सेवक आहोत. त्यामुळे कोणालाही जनतेचे मालक बनता येणार नाही”

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “बबनराव लोणीकरांचं वक्तव्य हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यांनी जरी ते काही लोकांना उद्देशून केलेलं असं वक्तव्य असलं तरी अशा प्रकारचं बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही. देशाचे पंतप्रधान जेव्हा सांगतात की मी या देशाचा प्रधानसेवक आहे. आम्ही सर्वजण जनतेचे सेवक आहोत. तर, आम्हाला जनतेचे मालक होता येणार नाही. त्यामुळे बबनराव लोणीकर यांचं जे वक्तव्य वृत्तवाहिन्यांवर दाखवलं जात आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. असं वक्तव्य योग्य नाही. त्यामुळे बननराव लोणीकरांना समज दिली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles