18 जुलैला, भारतातील सर्वात मोठे क्रिप्टो एक्सचेंज WazirX मधून हॅकर्सनी 230million dollars मार्केट व्हॅल्यू असलेले म्हणजे साधारण 2000 करोडचे क्रिप्टो डिपॉझिट लुटून नेले.
लझारस नावाचा कुप्रसिद्ध नॉर्थ कोरियन हॅकर ग्रुप ह्या हॅकिंग मागे असल्याचे मानले जात आहे.
लाझारस ग्रुपने या आधी अमेरिका जपान सारख्या मोठमोठ्या देशातील क्रिप्टो एक्सचेंज मधून हजारो करोडची क्रिप्टो करन्सी लुटली आहे.
#WazirX च्या संपूर्ण डिपॉझिट पैकी 50% हून अधिक क्रीप्टो डिपॉझिट लुटल्या गेले आहे. क्रीप्टो करन्सी हॅक केल्यानंतर साधारणपणे , हॅकर्स हॅकिंग ची जबाबदारी घेतात आणि वाटाघाटी करून लुटलेल्या क्रिप्टो करन्सी पैकी काही टक्के स्वतःकडे ठेवून बाकी परत करतात.
मात्र लाजारस ग्रुप वाटाघाटी न करण्याबाबत कुप्रसिद्ध आहे.
लुटलेल्या #cryptocurrency परत मिळण्या करिता WazirX प्रयत्नात आहे मात्र लाझारस कडून लुटलेली क्रिप्टो करन्सी वसूल होण्याची शक्यता धूसर आहे.
क्रिप्टो एक्सचेंज किंवा crypto wallets हॅक झाल्यास लिक्विडेशन करून क्रिप्टोकंपनीज किरकोळ गुंतवणूकदारांचे पैसे परत करतात मात्र या प्रोसेसला अनेक वर्ष देखील लागू शकतात त्यामुळे भारतीय किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले आहे.
2021 मध्ये भारत सरकारने क्रिप्टो व्यवहारांवर 28% टॅक्स लावून या क्षेत्राला मरणासन्न करून टाकलेले आहे.शिवाय ऑगस्त 2022 मध्ये Enforcement Directorate (ED) ने WazirX वर रेड टाकून जवळ जवळ 90 करोड वसूल केलेत.
भारत सरकारने क्रिप्टो व्यवहारांवर 28% टॅक्स आणि 1% TDS लादल्यामुळे , भारतातील किरकोळ क्रिप्टो व्यवहार थंडावलेत त्यामुळ गेल्या वर्षी नाईलाजाने भारतातील अनेक क्रिप्टो एक्सचेंजेस दुबई सिंगापूर अशा टॅक्स फ्रेंडली देशांमध्ये शिफ्ट झालेत.
क्रिप्टो करन्सी रेगुलेशन्स करिता दोन वर्षापासून पार्लमेंट मध्ये एक क्रिप्टो बिल पेंडिंग आहे. बिलाद्वारे या क्षेत्रातील जाचक अटी आणि टॅक्सेस कमी होतील अशी क्रिप्टो गुंतवणूकदारांना आशा आहे.