मुख्यमंत्री लाडकी बहिन योजनेसाठी १ कोटी महिलांची नोंदणी
महाराष्ट्र (Maharashtra) :- राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना रक्षाबंधनाच्या दोन दिवस आधीच पहिला हप्ता दिला जाणार आहे. याचाच अर्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आपल्या लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचं गिफ्ट हे 19 ऑगस्टच्या आधीच मिळणार आहे. येत्या 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. पण त्याआधीच 17 तारखेला सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात योजनेचा पहिला हप्ता पाठवण्याचा निर्णय आजच्या मैत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
आगामी विधानसभा (Assembly Election) निवडणुकीच्याआधी राज्य सरकारकडून जाहीर झालेली लाडकी बहीण योजना ही सर्वात महत्त्वकांक्षी योजनांपैकी एक योजना आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 17 ऑगस्टला पहिला हप्ता मिळणार आहे. या दिवशी सर्व महिलांच्या बँक खात्यात एकाच दिवशी आणि एकाच वेळी 3000 रुपये जमा होणार आहेत. या दिवशी लाभार्थी महिलांना दोन महिन्यांचे एकत्र पैसे मिळणार आहेत. विशेष म्हणजे महिलांना आता या योजनेच्या पैशांसाठी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही हे आता स्पष्ट झालं आहे. सरकारकडून 17 ऑगस्टला पैसे वाटपासाठी कार्यक्रम पार पडेल. यावेळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री कदाचित एकदाच क्लिक करतील आणि सर्व महिलांच्या बँक खात्यात एकाचवेळी योजनेचे पैसे जमा होतील.