Friday, August 1, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

खंडणी नेटवर्क मजबूत करण्यासाठी सलमानच्या घरी गोळीबार

मुंबई, 9 जुलै :- अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपींविरोधात मोक्का कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे.या गोळीबार प्रकरणानंतर महाराष्ट्रात खंडणीच नेटवर्क मजबूत करण्याचा बिश्नोई गँगचा प्रयत्न होता. मुंबई पोलिसांनी सतराशे पानांचे आरोपपत्र दाखल केले असून यामध्ये अनमोल बिष्णोई आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्या विरोधातही आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

या सगळ्या आरोपींविरोधात मोक्का अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून सोमवारी सत्र न्यायालयातील विशेष मोक्का कोर्टात आरोपपत्र दाखल केले.मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, राज्यात बिष्णोई गँगला खंडणीच रॅकेट वाढवायचे होते. खंडणी उकळण्याच्या उद्देशानेच बिश्नोई गँगकडून सलमानच्या घरावर गोळीबार करण्यात आला असल्याचे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. बिश्नोई गँगचा प्रमुख लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोईसह पोलिसांनी या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींविरोधातही आरोपपत्र दाखल केले आहे. सलमान खानला वेगवेगळ्या माध्यमातून धमकी देऊन त्याच्या घरावरती गोळीबार करून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न झाला असल्याचे पोलिसांनी म्हटले. सलमान खानने मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबातही खंडणी उकळण्याचा हा प्रयत्न दिसतोय असाच जबाब दिला आहे. बिश्नोई गँगच्या या कृत्यांमुळे मी आणि माझे कुटुंब भीतीच्या वातावरणाखाली जगत आहोत असेही सलमानने मुंबई पोलिसांना जबाब सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles