Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

Hope Hospital Fire- होप चिल्ड्रेन हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरला आग

अमरावती (Amaravati) 4 फेब्रुवारी। :- राजकमल ते राजापेठ मार्गावर मुधोळकर पेठ येथील होप चिल्ड्रेन हॉस्पीटलच्या ऑपरेशन थिएटर मधील वातानुकूलित यंत्रणेला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. मात्र अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्वरीत धाव घेत आग आटोक्यात आणल्याने – पुढील अनर्थ टळला.

दरम्यान या ठिकाणी भरती असलेल्या पाच बालकांना अन्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. सोमवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक मुधोळकर पेठ येथे होप चिल्ड्रेन हॉस्पीटल आहे. या ठिकाणी अगदी एका दिवसांच्या बाळापासून ते १८ वर्षापर्यंतच्या मुलांचे उपचार केले जातात. अतिदक्षता विभागासह सुसज्ज असलेले हे रुग्णालय लहान मुलांच्या उपचारासाठी प्रसिध्द आहेत. रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास या रुग्णालयात एका बालकावर ऑपरेशन थिऐटरम ध्ये शस्त्रक्रीया सुरु असतांना तेथील वातानुकूलित यंत्रणेमधून धुर निघत असल्याचे ऑपरेशन थिएटरमधील डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यांनी याची माहिती तत्काळ अग्निशमन यंत्रणेला व राजापेठ पोलीसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. रुग्णालयात असलेल्या आग विझविणाऱ्या सिलेंडरच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील् अनर्थ टळला. दरम्यान या आगेमुळे रुग्णालयात धुरच धुर झाल्याने लहान बालकांना त्रास होवू नये या करीता वरील मजल्यावर भरती असलेल्या ५ बालकांना अन्य रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे.

Amaravati amrita campus
Amaravati temple
Amaravati located in which district
Amaravati which stateAmaravati Andhra Pradesh map
Amaravati tourist places
Amaravati map
Where is Amaravati located in India map

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles