अमरावती:- अमरावती (Amravati) शहरातील जुनी एमआयडीसी परिसरात हर्ष सपकाळ नावाच्या गृहस्थाने जागा भाड्याने घेऊन नकली बॉबी देशी दारू बनवण्याचा गोरख धंदा गेल्या पाच महिन्यापासून सुरू होता, मात्र तो गुरुवारी रात्री अमरावती गुन्हे शाखेच्या पोलीस विभागाने उदध्वस्त केला. यामध्ये लाखो रुपयांचा नकली देशी दारू, केमिकल चा माल सुद्धा जप्त केला आहे.हर्ष सपकाळ हा मुंबईवरून केमिकल विकत आणून अहमदनगर कोपरगाव येथील कंपनीच्या नावाने बॉबी 90 ml बॉटलवर नकली रजिस्ट्रेशन नंबर टाकून संपूर्ण जिल्ह्यामध्ये ती दारू विकत होता. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी या गोरखधंदयावर छापा टाकून तेथून लाखो लिटर केमिकल,प्रिंटिंग मशीन, व दारूच्या रिकाम्या बॉटल जप्त केले आहे. यामध्ये पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, पोलीस उपायुक्त कल्पना बारवकर यांच्यासह गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने कारवाई केली.
अमरावती एमआयडीसी परिसरातील प्लॉट नं. ई 26 या ठिकाणी असलेल्या फॅक्टरीमध्ये काही इसम आपल्या आर्थीक फायद्याकरीता अवैधरीत्या बनावटी देशी दारूची निर्मीती करीत आहे अशी गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक माहीती मिळाली होती. त्यामुळे लागलीच वरिष्ठांना माहीती देवून सदर पथकांने दोन शासकीय पंचांना सोबत घेवून मिळालेल्या माहीतीप्रमाणे अमरावती एमआयडीसी परिसरातील प्लॉट नं. ई 26 या ठिकाणी जाउन फॅक्टरीमध्ये रेड केली असता सदर ठिकाणी 1) हर्षवर्धन रमेश सपकाळ वय 42 वर्ष रा. मोतीनगर बगीच्याजवळ, अमरावती 2) सागर सुरेश तिवारी वय 43 वर्ष लॉर्डस हॉटेलच्या मागे, गणपती नगर, अमरावती 3) योगेश विकास प्रधान वय 24 वर्ष काम मजुरी रा. गल्ली नं. 9. किरण नगर, अमरावती हे तीन इसम आपल्या आर्थीक फायद्याकरीता सदर ठिकाणी” देशी दारू बॉबी संत्रा आणि देशी दारू टैंगो पंच” कंपनीच्या देशी दारूच्या नकली मालाची निर्मीती करताना रंगेहात पकडले. सदर ठिकाणी आरोपीतानी अहमदनगर येथे असलेल्या बॉबी आणी संजीवणी देशी दारू संजिवणी डिस्टीलरी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना लिमीटेड ता. कोपरगाव जि अहमदनगर महाराष्ट्र येथे निर्मीत होत असलेल्या” देशी दारू बॉबी संत्रा” आणि” देशी दारू टैंगो पंच या मुळ कंपनीप्रमाणेच हुबेहुब देशी दारूचा नकली माल तयार करण्याकरीता आवश्यक असलेले अल्कोहोल, ऑरेंज फ्लेवर, आर ओ प्लांट, बॉटल फिलीग मशीन, कॅपींग मशीन, प्रिंटींग साहीत्य, बॉक्स, रिकाम्या बॉटल, स्टॅम्प, प्रींटेड सेलो टेप व इतर साहीत्याच्या माध्यमातुन नकली बनावटी संजीवणी देशी दारू या ब्रांडची निर्मीती करताना मिळून आले. आरोपी हे सदर निर्मीती केलेला नकली माल आपल्या इको स्पोर्ट कार क्र. एम एच 35 पी 5919 ने अमरावती जिल्हयातील अवैधरीत्या किरकोळ विक्रेत्यांना विकत होते. आरोपीतांकडून 90 मिली नकली देशी दारूने भरलेल्या बॉटल असलेले 3400 बॉटल, 35 लीटर क्षमतेच्या फार्माग्रेड अल्कोहोलने भरलेल्या एकुण 21 कॅन, गोल्डन ऑरेंज फ्लेवरच्या 5 लीटर क्षमतेच्या 7 कॅन, निर्मीती करीता वापरलेल्या वेगवेगळ्या मशीनरी, प्रींटींग साहीत्य, आणि इको स्पोर्ट कार क्र. एम एच 35 पी 5919 असा एकुण असा एकुण 10,90,248 रू चा माल जप्त करण्यात आला.
सदर ची कार्यवाही सदरची कार्यवाही नविनचंद्र रेड्डी, पोलीस आयुक्त अमरावती शहर यांचे आदेशाने श्रीमती कल्पना बारवकर पोलीस उपायुक्त (मुख्यालय) व गणेश शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडळ क्र 2. अमरावती शहर तथा दत्तात्रय भवर सहायक पोलीस आयुक्त राजापेठ विभाग यांचे मार्गदर्शनाखाली गोरखनाथ जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट क्र. 1. स.पो.नि. मनिष वाकोडे, योगेश इंगळे, अनिकेत कासार पोउपनि प्रकाश झोपाटे, पो.हवा फिरोज खान, पो.शी. सुरज चव्हाण, अमोल मनोहर, निखील गेडाम, अनिकेत वानखडे, सुधीर गुडघे, अलीमोद्दीन खातीम यांनी केली.