अमरावती, 25 मे, : पावसाचे पाण्याचा जलदगतीने निचरा व्हावा म्हणून शहरातील छोट्या-मोठ्या नाल्यांची साफसफाई करण्याचे निर्देश आयुक्त देविदास पवार यांनी दिले. त्यानंतर शहरातील मोठ्या नाल्यांची काही दिवसांपूर्वी नाल्यात तुंबलेला कचरा बाहेर काढायला सुरुवात झाली आहे. जेसीबी व पोकलँडच्या मदतीने शहरातील मोठ्या नाल्यांची साफसफाई ,गाळ करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
सध्या पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अश्यातच शहरातील मुख्य नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचालेला आहे. तर, शहरात विविध विविध भागात साचलेला कचरा देखील नियमित उचलला जात नसल्याने पावसाळ्यात रोगराई पसरण्याची अधिक शक्यता आहे.दैनंदिन साफसफाई, नाले-नाल्यांची सफाई करण्याचे आदेश आयुक्त देविदास पवार यांनी दिले आहे. शिवाय आयुक्त स्वत: रस्त्यावर उतरून शहरातील साफसफाईचा आढावा घेत आहे. त्यामुळे आता साफ सफाई व गळ काढण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.