मुंबई (Mumbai):- लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे निवडणूक चिन्ह देण्यात आले होते. तर अपक्ष उमेदवारांना ‘पिपाणी’ हे निवडणूक चिन्ह मिळाल्याने शरद पवारांच्या पक्षाला फटका बसला. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणुक आयोगाला पत्र धाडण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election) पिपाणी चिन्ह वगळण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सातारा लोकसभेसह दिंडोरी लोकसभा मतदारसंघात पिपाणी या चिन्हामुळे निवडणुकीत फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे. सातारा मतदारसंघातील शशिकांत शिंदे यांचा 45 हजार मतांनी पराभव झाला होता. या मतदारसंघात 37 हजार मते अपक्ष उमेदवाराच्या पिपाणीला पडली आहेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा 1 लाख 13 हजार 199 मतांनी पराभव केला. तर अपक्ष उमेदवार बाबू भगरे यांना तब्बल 1 लाख 03 हजार 632 मतं मिळाली होती. बाबू भगरे यांचे चिन्ह पिपाणी होते. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला पत्र पाठवले आहे.