Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

स्फोट प्रकरणी चामुंडीच्या संचालक व व्यवस्थापकाला अटक

जमाव आक्रमक; मृतदेह असलेली ॲम्बुलन्स कंपनीच्या प्रवेशद्वारावर नेली

नागपूर जिल्ह्यातील धामणा गावाजवळ असलेल्या चामुंडी एक्सप्लोसिव प्रा. ली. कंपनीत भीषण स्फोट झाला. यामुळे सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी
चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीच्या संचालक व व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान जमाव आक्रमक झाला असून, मृतदेह असलेली ॲम्बुलन्स कंपनीच्या प्रवेशद्वारावर नेण्यात आली.

नागपूर अमरावती महामार्गावर नागपूर पासून २५ किलोमीटर अंतरावर धामणा हे गाव असून येथे बारूद तसेच फटाक्याच्या वाती निर्माण केल्या जातात. कंपनीत नेहमीप्रमाणे बारूद पॅकिंग व हाताळणीचे काम सुरू असताना गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास अचानक भीषण स्फोट झाला आणि त्यात आत मधील सर्वजण गंभीर जखमी झाले. मोठा आवाज झाल्यामुळे आजूबाजूच्या गावातील हजाराच्या संख्येत नागरिक या स्फोटाच्या कारखान्याकडे धावले. त्यांनी जखमींची मदत करण्याचे प्रयत्न केले. ॲम्बुलन्स घटनास्थळी बोलवून सर्व जणांना नागपूरला रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान, पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल त्यांच्यासह अनिल देशमुख हे सुद्धा घटनास्थळी पोहोचले. पोलिसांचा ताफा आणि स्फोटक विशेषज्ञ पोहोचले. त्यांनी घटनास्थळी सहा जणांचा मृत्यू झाल्याने जमाव आक्रमक झाला आहे. या घटनेप्रकरणी चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीच्या( Chamundi Explosive Company) संचालक व व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे.

#नागपूर जवळील धामणा इथल्या चामुंडी या स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत झालेल्या स्फोट दुर्घटना स्थळाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाहणी केली.

नागपूर येथील चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीत झालेल्या स्फोटात ६ कामगारांचा मृत्यू झाला, मृताच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. स्फोटके बनवणाऱ्या चामुंडी कंपनीत अक्षम्य बेजबाबदारपणा झालाय, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. घटनास्थळी भेट दिल्यावर राज्य सरकारवर गंभीर आरोप केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles