Saturday, June 21, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

देवेंद्र फडणवीसवांचा विजयी षटकार …

नागपूर (Nagpur):- महाराष्ट्र निवडणुकीचा निकाल आज लागतो आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार आणि तो बरोबरीत सुटणार असे म्हटले जात असताना प्रत्यक्षात मात्र, मतदान यंत्रातून वेगळेच चित्र निर्माण झाले आहे. यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष हा १२९ जागांसह सध्या आघाडीवर आहे. तर ज्यांना बरोबरीने सत्ता मिळण्यासाठी दावेदार मानले जात होते, त्या महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेते पदही मिळते की नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी स्थिती निर्माण झाली आहे. ही निवडणूक खूप चुरशीची झाली. महाराष्ट्रात काय घडणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. राज्यात २८८ जागांसाठी सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतांचा टक्का देखील वाढला होता.
अशातच भाजपाच्या नेतृत्वात महायुतीला‌ एकहाती सत्ता मिळणार‌ अशी असे चित्र निवडणूक निकालानंतर निर्माण होत आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री व नागपुरातील दक्षिण पश्चिम मतदारसंघातील उमेदवार देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा विजय निश्चित झाला आहे. दक्षिण पश्चिम विधासभा मतदारसंघातील नागपूरचे नेतृत्व करणारे कणखर उमेदवार देवेंद्र फडणवीस हे सलग यंदा सहाव्यांदा विधिमंडळात प्रतिनिधित्व करणार आहेत. दक्षिण पश्चिम जनतेच्या मनातील नेते देवेंद्र फडणीस यांच्या विजयानंतर ते नागपूरकरांच्या मताप्रमाणे, पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील का, याचं उत्तर अजूनही गुलदस्त्यात आहे.

महायुतीने आणलेल्या लाडकी बहीण योजना, वयोश्री योजना या महायुतीच्या परिश्रमाचं फळ देवेन्द्र फडणवीसांच्या वाट्याला येईल असं म्हटलं जात आहे. दरम्यान, नागपुरात काॅंग्रेसचे विकास ठाकरे, नितीन राऊत यांनी मतांची आघाडी घेतली आहे.

Nagpur is famous for
www.nagpur.gov.in 2024
Nagpur which state
Nagpur map
Nagpur city population
Nagpur GDP in billion
Nagpur city area in sq km
Flights to Nagpur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles