Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

देवेंद्र फडणवीसांनी घेतला मोठा निर्णय ‎lokvahini News | लोकवाहिनी | Marathi Newsनागपूर

बदलापूर पेटले पोलिसांचा पुन्हा लाठीमार

आंदोलकांना रेल्वेरुळांवरुन हटवले

मुंबई लगतच्या बदलापूर येथील एका नामांकित शाळेत 2 चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. यामुळे येथील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेत. त्यांनी बदलापूर बंदची हाकही दिली आहे.. त्यामुळे आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे.वारंवार विनंती करून आंदोलक माघार घेत नसल्याने गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली सध्या पुन्हा एकदा पोलिसांनी शांततेची भूमिका घेतली असून हात जोडून आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न सुरू.आहे दगडफेकीत तीन ते चार पोलीस जखमी झाल्याची प्राथमिक माहिती.समोर आली आहे
——–

बदलापूरमध्ये जमावाचा उद्रेक

देवेंद्र फडणवीसांनी घेतला मोठा निर्णय

बदलापूरमध्ये मोठा जमाव अद्यापही रेल्वे स्थानकावर ठिय्या आंदोलन करत आहे. चिमुकलयांवर केलेल्या शाळेतील सफाई कामगाराने लैंगिक अत्याचाराच्या केल्याने खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास उशिर केला. मंगळवारी बदलापूरमधील वातावरण चांगलंच तापलं, रास्ता रोको आणि रेल रोको आंदोलने करण्यात आली. अशातच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे निर्णय घेतले आहेत.बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना सुद्धा त्यांनी दिले आहेत. कारवाईत विलंब करणारे बदलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.
———-

बदलापूर आंदोलनामुळे पुणेकर मुंबईत अडकले

अनेक एक्सप्रेस ट्रेन खोळंबल्या

बदलापुरातील नामांकित शाळेत 4 वर्षाच्या दोन मुलींवर अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संतापाचा उद्रेक पहायला मिळाला.. संतप्त पालक आणि नागरिकांनी रेल्वे आणि रस्ते वाहतूक अडवून धरली.. बदलापूर रेल्वे स्थानकात संतप्त पालकांनी रेल रोको आंदोलन केलंय. त्यामुळे बदलापूर-कर्जत रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. याचा मोठा फटका रेल्वे प्रवाशांना बसला आहे. रोज मुंबई पुणे असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसला आहे. लांब पल्ल्या एक्सप्रेस ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तर अनेक लांब पल्ल्या एक्सप्रेस ट्रेन खोळंबल्या आहे. यामुळे पुणेकर मुंबईत अडकल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
———–

सुषमा अंधारे यांची जहाल टीका

केली राजीनाम्याची मागणी

बदलापूर येथील लहान मुलींवरील लैंगिक अत्याचार पकरणात विरोधक आक्रमक झाले आहेत. बदलापूरच्या घटनेवरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या राजीनामाची मागणी केली आहे. एकूणच गुन्हा दाखल करुन घेण्यासाठी लागलेला वेळ आणि हयगय यावरुन आज सकाळपासून बदलापूरात एकच संताप व्यक्त झाला. रेल्वेसह बस सेवा कोलमडली. आंदोलन चिघळले. शाळेत तोडफोड करण्यात आली. जमाव आक्रमक झाला. या घटनेनंतर अंधारे यांनी फडणवीसांवर जहाल टीका केली…

——–


सिक्कीम भूस्खलनात वीज केंद्र उध्वस्त

टेकडीचा मोठा भाग घसरला

मंगळवारी सकाळी झालेल्या भूस्खलन एक वीज केंद्र पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात सातत्याने दरडी कोसळत आहेत. पूर्व सिक्कीममधील सिंगताम येथील दिपू दराजवळील बलुतार येथे भूस्खलनामुळे 510 मेगावॅट वीज केंद्राला लागून असलेली टेकडी धोक्यात आली होती. टेकडीचा मोठा भाग घसरला आणि नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनच्या तीस्ता स्टेज 5 धरणाचे पॉवर स्टेशन ढिगाऱ्याखाली गेले..या भूस्खलनात मोठे दगड आणि मोडतोड पॉवरहाऊसच्या दिशेने वेगाने पडत असल्याचे दिसत आहे.यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही, सतत भूस्खलन होत असल्याने वीज केंद्र काही दिवसांपूर्वी रिकामे करण्यात आले होते..
——–

केरळमध्ये होणार संघाची तीन दिवसीय बैठक

३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान होणार बैठक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान केरळच्या पलक्कड येथे होणार आहे. संघाची ही 3 दिवसीय बैठक वर्षातून एकदा घेतली जाते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पुण्यात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, संघप्रणित विविध संघटनांमध्ये काम करणाऱ्या संघटनेचे प्रमुख अधिकारी अखिल भारतीय समन्वय बैठकीत सहभागी होतात. या सर्व संस्था सामाजिक जीवनातील विविध क्षेत्रात सकारात्मक कार्यात लोकशाही मार्गाने समाजपरिवर्तनाच्या कार्यात सक्रिय राहतात. बैठकीत विविध संस्थांचे अधिकारी त्यांच्या कामाची माहिती आणि अनुभव सांगतात. राष्ट्रीय हिताच्या विविध विषयांच्या संदर्भात सध्याची परिस्थिती, अलीकडील महत्त्वाच्या घटना आणि सामाजिक बदलाच्या इतर आयामांवरील योजनांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.

———

पुढील तीन दिवस सर्वत्र पावसाची शक्यता

हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती

गेल्या दोन आठवड्यांपासून विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यातच आता हवामान विभागाने राज्यात पुढील तीन-चार दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन करण्यात आलं आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील तीन दिवस सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच आज आणि उद्या कोकणात वादळी वाऱ्यांसह सर्वत्र हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईत पुढील दोन दिवस पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईत आज आणि उद्या अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपात पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
————

पंतप्रधानांची अन्वर इब्राहिम यांच्याशी द्विपक्षीय चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मलेशियाचे समकक्ष अन्वर इब्राहिम यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली ज्या दरम्यान दोन्ही राष्ट्रांनी आपले संबंध सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी’कडे ढकलण्याचा निर्णय घेतला . “मागील वर्षांमध्ये, मलेशियाने भारतात $5 अब्ज डॉलर्सपर्यंतची गुंतवणूक केली आहे आज, आम्ही निर्णय घेतला आहे की आम्ही आमचे सहकार्य ‘सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी’च्या पातळीवर वाढवू.आमचा विश्वास आहे की आर्थिक सहकार्याच्या दृष्टीने दोन्ही देशांमध्ये अजूनही भरपूर वाव आणि क्षमता आहे ,” असे पंतप्रधान मोदी यांनी मलेशियाच्या पंतप्रधानांसोबत पत्रकारांना संबोधित करताना दोन्ही देशांच्या प्रमुखांनी केलेल्या करारांची आणि सामंजस्य करारांची माहिती देताना सांगितले.
————-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles