Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की….. !

मुंबईच्या आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आज सायंकाळी मोठ्या थाटात पार पडला. राज्याचे 21वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यांच्यासोबत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी देखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हा सोहळा बघण्यासाठी राज्यभरातील ४० हजार कार्यकर्ते दाखल झाले होते. नागपूर शहरातून देखील मोठ्या संख्येने देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक देखील मुंबईत दाखल झाले होते.
मुंबईच्या आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आज सायंकाळी मोठ्या थाटात पार पडला. राज्याचे 21वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यांच्यासोबत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी देखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री प्रेम खांडू, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्यासह देशभरातील भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते. या शपथविधी सोहळ्यात धर्मगुरू, साधू-महंत यांनीही उपस्थित राहून सरकारला आशीर्वाद दिलेत. या शपथविधीच्या कार्यक्रमासाठी विशेष आसनव्यवस्था निश्चित करण्यात आली होती. या पहिल्या रांगेत फडणवीस कुटुंबिय आणि अंबानी कुटुंबिय बसले होते. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली. २०१४ साली फडणवीसांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली होती. मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा भव्यदिव्य सोहळा पार पडला होता. २०१४ ते २०१९ सलग ५ वर्ष मुख्यमंत्रिपद सांभाळणारे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे दुसरे मुख्यमंत्री ठरले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles