अहमदनगर 1 जुलै:- नगर तालुक्यातील इसळक-निबळक येथील श्री क्षेत्र कोटीलिंग तीर्थ येथून सालाबादप्रमाणे श्री समर्थ सदगुरु योगीराज हरिहर महाराज पायी दिंडी सोहळा पंढरपूर आषाडी दिंडी साठी ६ जुलै रोजी प्रस्थान करणार असून दिंडीचे हे ५९ वे वर्ष आहे,अशी माहिती दिंडीच्या संयोजकांनी दिली आहे.डॉ.जालिंदर महाराज निकम यांनी दिली आहे.
समर्थ हरिहर महाराज संस्थान व महादेव मंदिर ट्रस्ट संचालित हि दिंडी असून इसळक-निबळक येथील श्री क्षेत्र कोटीलिंग तीर्थ येथून ६ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजता निघणार आहे.यावेळी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती डॉ.जालिंदर महाराज निकम यांनी दिली आहे.दिंडी सोहळा श्री क्षेत्र कोटीलिंग तीर्थ येथून निघाल्यावर पहिला मुक्काम निबलक येथे राहणार असून दुसऱ्या दिवशी दिंडी नगर मधील भुतकरवाडी येथील यादवराव खेडकर यांच्या येथे दुपारचे जेवण घेणार आहे.
पुढे माळीवाडा येथे मोकाटे यांच्या येथे मुक्कामी राहणार आहे.८ जुलै ला दिंडी सोहळा वाळुंज फाटा मार्गे पुढे जाऊन रात्रीचा मुक्काम नगर तालुक्यातील रुईछत्तीशी येथे राहणार आहे.तर पुढे करमाळा मार्गे हा सोहळा १६ जुलै ला पंढरपूरला पोहचणार आहे.द्वादशीला काल्याचा प्रसाद झाल्या नंतर दिंडी सोहळा विसर्जित होणार आहे.दिंडी सोहळाचा पंढरपूर येथील मुक्काम हरिहर महाराज संस्थान, बार्शी नगर रोड,शेगाव दुमला,पंढरपूर येथे राहणार आहे.ज्यांना या दिंडी सोहळ्यात सहभागी व्हायचे त्यांनी ६ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजता इसळक -निबळक येथील श्री क्षेत्र कोटीलिंग तीर्थ हजर राहावे व दिंडीत वारकऱ्यांनी शिस्त पाळावी असे आवाहन संयोजकांनी केले आहे.