Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

आशा भगिनींना अँण्ड्रोइड फोन देण्याचा निर्णय

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

नागपूर (Nagpur) :- आरोग्यासह सर्वांच्या परिवाराची काळजी घेणाऱ्या आशा भगिनींच्या कामांमध्ये सुकरता यावी तसेच त्यांची कार्यक्षमता वाढावी यासाठी सरकारने अँण्ड्रोइड फोन देण्याचा निर्णय घेतला. यासोबतच त्यांच्या मोबाईलला वार्षिक रिचार्ज देण्याचीही व्यवस्था खनिज निधीतून करण्यात आली आहे. आशा सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा तसेच त्यांना ₹10 लाखांपर्यंतचा विमा देण्याचा निर्णय देखील शासनाने घेतला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली.

नागपूरच्या नवनिर्मित प्राथमिक आरोग्य केंद्र व निवासस्थानांचे आज रेशीम बाग, नागपूर येथे लोकार्पण केले. यासोबतच घाटपेंढरी (ता. पारशिवणी), भोरगड आणि झिल्पा (ता. काटोल) अशा 3 प्राथमिक आरोग्य केंद्रांचेही उदघाटन केले तसेच जिल्हास्तरीय आशा सेविकांना मोबाइल वितरण व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत नियुक्ती पत्र वाटप केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles