Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

लाडक्या बहिणींनो बँक खातं तपासा, दीड हजार रुपये येण्यास सुरुवात

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojna) मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं असून या योजनेतील सन्माननिधीच्या वितरणाला आजपासून सुरुवात झाली आहे. अनेकांच्या खात्यात पैसे जमा झाले असून आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात हे पैसे जमा झालेत की नाही हे तपासण्याचं आवाहन केलं जात आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भातील एक्सवर माहिती दिली आहे.

गेल्यावर्षी जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्याचे आश्वासित करण्यात आले. त्यानुसार, ऑगस्ट महिन्यापासून हा लाभ पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला. ऑक्टोबर महिन्यापर्यंत सरकारने या योजनेसाठी महिलांना अर्ज करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरले आणि पात्रही झाले. एप्रिल महिन्यापर्यंत महिलांना १० हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत, तर मे महिन्याचा ११ वा हप्ताही महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

एप्रिल महिन्याचा हप्ता गुढीपाडव्यापासून देण्यात आला होता. त्यामुळे मे महिन्याचाही हप्ता मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, मे महिना उलटला तरीही हप्ता खात्यात जमा न झाल्याने अनेकांनी चिंता व्यक्त केली. त्यातच, छाननी प्रक्रिया सुरू झाल्याने आपलाही अर्ज बाद झाला की काय अशी शंका अनेक पात्र महिलांना वाटू लागली. दरम्यान, जानेवारी महिन्यापासून अनेक पात्र महिलांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून यामधून जवळपास लाखो सरकारी कर्मचारी महिलांचे अर्ज बाद ठरवण्यात आले आहेत. तर, विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांनाही अपात्र करण्यात आलं आहे. या छाननी प्रक्रियेतून यशस्वी ठरलेल्या पात्र महिलांच्या खात्यात आता दीड हजार रुपये जमा केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles