Saturday, June 21, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

Kalyan Constituency : मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

डोंबिवली : कल्याण लोक सभा मतदार संघातील निवडणूक प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर आता उद्या मंगळवारी 4 जून रोजी मतदान मोजणीला सुरुवात होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिलेल्या माहितीनुसार मतमोजणीच्या 29 फेऱ्या होणार असून त्या नंतरच निकाल हाती येणात आहे. याविषयी सातपुते यांनी अधिक माहिती देतात सांगितले की, मतमोजणीच्या प्रक्रियेत एकूण 6 विधानसभा मतदार क्षेत्र आहेत. प्रत्येक मतदार क्षेत्रासाठी 14 टेबल असणार आहे. त्यानुसार एकूण 84 टेबल असणार आहेत. प्रत्येक उमेदवार आणि त्यांचे मतदान मोजणी प्रतिनिधी, सरकारी कर्मचारी यांना मोबाईल कॅल्क्युलेटर वापरण्यास बंदी आहे.

प्रत्येकाने एक कोरा कागद, पेन आणि 17 सी चा भाग एक आणि दोन जो मतदाना दिवशी त्यांना प्राप्त झाला होता तो आणायला प्राधान्य देण्यात आले आहे. टपाली मतदान आणि सेवा मत पत्रिकाची मोजणी स्वतंत्र होणार आहे. (Counting of newspapers will be independent)त्यासाठीही वेगळ्या टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी 8 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल. कल्याण लोकसभा मतदार संघात एकूण 28 उमदेवार उभे आहेत. मतदानाचा कौल कोणाच्या पारड्यात पडेल हे मंगळवारी स्पष्ट हाईल. हिंदुस्थान समाचार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles