अमरावती : वाहतुकीच्या रस्त्यावर विनापरवानगीने डीजे वाजवून काँग्रेसचा उमेदवार विजयी झाल्याबद्दल जल्लोष साजरा (Celebration of Congress candidate winning)करत असताना रस्त्यवरून जाणाऱ्या महिलेला मारहाण करण्यात आली. यामधे झालेल्या वादातून पोलिसांनी १५ जणांवर(Police on 15 people)गुन्हे दाखल केले असून तीन जणांना अटक करण्यात आली असल्याची घटना चांदूर बाजार पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडली आहे.
स्थानिक गाडगे नगर चौका जवळ सुधीर महल्ले यांच्या घराजवळ लोकसभा निवडणुकीत निवडून आल्याचा आनंद उत्सव साजरा केला जात होता. त्यावेळेस या मार्गावरून एक महिला आपल्या पतीसह आपल्या घराकडे मोटार सायकलने जात असताना, विशिष्ठ समाजातील दोन ते तीन मुलांनी महिलेसह पतीला मारहाण केली. त्यांना लाता मारल्या व एका मुलाने पोटात बुक्क्या मारल्या. यावरून त्या महिलेचे पती, भासरे व मोहल्यातील विजय मोहोड यांनी सदर मुलांना जाब विचारला असता दहा ते पंधरा मुलांनी लाता बुक्क्यांनी मारहान करून शिवीगाळ केली असल्याचे पोलिसांना फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. यावरून पोलिसांनी १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यातील ३ आरोपींना अटक करण्यात आले आहे. पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली असून विनापरवाना सार्वजनिक ठिकाणी डीजे वाजवणाऱ्या डीजेची गाडी सुद्धा पोलिसांनी जप्त करून त्यावर कार्यवाही केली.
यासंदर्भात चांदूरबाजारचे पोलिस निरीक्षक सूरज बोंडे(Police Inspector Suraj Bonde of Chandurbazar) यांनी सांगितले की, या घटनेच्या निषेधार्थ हिंदूत्ववादी संघटनेने आज ६ रोजी चांदुर बाजार बंदची हाक दिली. या बंदाच्या हाकेला सराफा लाईन, कापड लाईन, आदी प्रतिष्ठान बंद ठेवण्यात आले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता परतवाडा, ब्राह्मणवाडा थडी, आरसीपीना पाचारण करण्यात आले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी अतुल नवगिरे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सुरज बोंडे, एपीआय बारड, ए एसआय विनोद इंगळे, श्रीकांत निंभोरकर, आशिष इंगळे, गौरव पुसदकर यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी परिस्थिती लक्ष ठेवून होते. “ या घटनेतील तीन आरोपी अटक करण्यात आले असून इतरांचा शोध घेणे सुरू आहे. शहरातील नागरिकांनी शांतता ठेवावी असे आवाहन त्यांनी केलेय.