आणखी एक परीक्षा रद्द
सध्या पवईतील परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांची एकच झुंबड उडालेली पाहायला मिळत आहे. परीक्षा आजच झाली पाहिजे, अशी भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतली आहे. या परीक्षांबद्दलची पुढील तारीख लवकरच कळवली जाईल, अशी सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC मार्फत घेण्यात येणारी आजची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. लिपिक टंकलेखक पदासाठी होणाऱ्या कौशल्य चाचणीमध्ये तांत्रिक अडचणी आल्याने ही परीक्षा TCS कडून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षांची पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाईल, अशी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे.
MPSC मार्फत लिपिक टंकलेखक पदासाठी कौशल्य चाचणी परीक्षा 1 जुलै ते 13 जुलै या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. ही परीक्षा पवईतील ion digital zone या ठिकाणी होणार होती. मात्र 1 जुलैला सकाळच्या पहिल्याच सत्रात विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. लिपिक टंकलेखक पदासाठी कौशल्य चाचणी परीक्षेच्या पहिल्या सत्राचा वेळ हा 9 ते 10 या काळात होता. मात्र 12 वाजले तरी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राच्या बाहेर सोडण्यात आले नाही. तर दुसऱ्या सत्रातील विद्यार्थ्यांची परीक्षा 11:30 ते 12:30 वेळेत होती, त्यांना अजून परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आलेला नाही.