Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

महाराष्ट्रात दोन-चार दिवसात आचारसंहिता

अजित पवारांचा अंदाज

पुणे (Pune) :- विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. मात्र, निवडणुकांचं बिगुल वाजण्याच्या सर्वजण प्रतीक्षेत आहेत. राजकीय पक्षांनी देखील मोठी तयारी केली आहे, सभा, दौरे, पक्षांतर, भेटीगीटी, उमेदवारांची चाचपणी देखील सुरू आहे, अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. दोन चार दिवसात आचारसंहिता लागणार आहे. तुम्ही निवेदन दिल्यावर ती काम मार्गी लागण अवघड आहे असं अजित पवारांनी आज म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत आज उद्योग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, दोन चार दिवसात आचारसंहिता लागणार आहे. तुम्ही निवेदन दिल्यावर ती मार्गी लागणं अवघड आहे. बारामतीचे वातावरण चांगले ठेवण्यासाठी आपण 30 वर्ष प्रयत्न करीत आहोत. लोकसभेला जे काही झालं ते विसरून जाऊ. सगळ्यात जास्त निधी मी बारामतीला दिला आहे. आजपर्यंत आपण घड्याळाचे बटन दाबत आलेलो आहोत परंतु अपवाद लोकसभेचा आहे लोक विधानसभेला घड्याळाच्या चिन्हासमोरच बटन दाबून त्या उमेदवाराला विजयी करा असं आवाहन अजित पवारांनी यावेळी केलं आहे

अजित पवार यांनी आधीचं ट्विटर म्हणजेच, एक्स मीडियावर पोस्ट केली होती. त्यांनी लिहिलेलं की, “आमच्या बारामतीचा सुपुत्र सुरज चव्हाण बिग बॉस मराठीचा विजेता ठरला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत सूरजनं हे यशाचं सर्वोच्च शिखर गाठलं आहे. सूरज आपल्या मेहनतीच्या आणि प्रतिभेच्या जोरावर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. त्याच्या यशामुळे बारामतीचाच नव्हे तर, संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान वाढला आहे. सूरजला उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!”

Iiser pune
Pune district wikipedia
Pune news today Marathi
Pune map
What is Pune famous for
Pune district Name
Pune city area
Pune city area in sq km

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles