Thursday, July 31, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

बारावीच्या रिझल्टची तारीख बदलली….कधी लागणार बोर्डाचा रिजल्ट ?

 SSC-HSC Board Exam Result 2025 :- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालाचे कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे. या दोन्ही बोर्ड परीक्षांचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागेल, असं सांगण्यात येत होतं. मात्र आता बोर्ड परीक्षेच्या निकालाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली असून बारावीच्या परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्याऐवजी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शेवटी लागू शकतो, असं सांगितलं जात आहे.

येत्या 15 मेपर्यंत दोन्ही परीक्षांचे निकाल जाहीर होतील, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. दहावी, बारावीच्या लेखी परीक्षा दरवर्षीपेक्षा यंदा दहा दिवस लवकर सुरू झाल्या होत्या. विद्यार्थ्यांना पुढील करिअरच्या दृष्टीने नियोजनासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून परीक्षेसोबतच निकालदेखील लवकर जाहीर केला जाणार आहे.

बारावीच्या लेखी परीक्षेला 11 फेब्रुवारीपासून तर, दहावीच्या लेखी परीक्षेला 21 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली होती. सध्या सर्व विभागीय मंडळाच्या निकालाचा एकत्रित आढावा घेण्याचे काम सुरू आहे. साधारणपणे 5 मे ते 10 मेदरम्यान बारावीचा निकाल जाहीर होईल. तर 15 मेपर्यंत दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles