बाजारात ६० ते ८० रुपये किलो दर: कडक उन्हामुळे उत्पादनात घट
अमरावती, 22 मे : आरोग्याला संजीवनी देणारा आरोग्यवर्धक शेवगा हा वर्षातून दोनदा फुलतो व शेंगांनी बहरत असतो. आयुर्वेदिक औषधांमध्ये बहुगुणी व पौष्टिक भाजीपाला म्हणून शेवग्याच्या शेंगांकडे पाहिले जाते. जिल्ह्यात शेवग्याच्या शेंगांना ‘मुंगण्याच्या शेंगा’ म्हणूनही ओळखले जाते. काही भागात विविध प्रकारची नावे या शेंगांना आहेत. अमरावती शहरातील भाजी बाजारात सध्या शेवग्यांना ६० ते ८० रुपये किलो दर मिळतो आहे. कडक उन्हामुळे उत्पादन घटल्याने आवक मंदावली आहे.
बाजारपेठेत विविध भाजीपाल्यासह आरोग्यासाठी अत्यंत पोषक शेवग्याच्या शेंगा विक्रीस येत असतात. मोड आलेली मटकी जेवढ्या प्रमाणात शरीरासाठी आवश्यक आहे, तेवढ्याच शेवग्याच्या शेंगाही शरीरासाठी उपयुक्त व आवश्यक आहेत. आयुर्वेदात शेवग्याच्या फुलाला व शेंगांना विशेष स्थान आहे. बहुतांश नागरिक शेवग्याच्या पानांचा रस काढून प्राशन करतात. अनेक जण शेवग्याच्या फुलांची, पानांची भाजी करून खातात.यंदा मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून अवकाळी वादळी पाऊस सुरु आहे. शेवग्याचे झाड कडक असते(Fenugreek is hardy)वादळामुळे यंदा मोठ्या प्रमाणात झाडांचे नुकसान झाले. त्यातच कडक उन्हामुळे फुलोरा गळला. परिणामी उत्पादनात मोठी घट झाल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.