Thursday, August 7, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

Golden opportunity for students : धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये करिअर संसद

विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

नागपूर (Nagpur) :- – धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये करिअर संसद अंतर्गत विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. दिनांक ३ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या या चर्चासत्रात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करिअर संधी, कौशल्यविकास, रोजगार क्षमता आणि उद्योग क्षेत्रातील संधी यावर सखोल चर्चा करण्यात आली.या चर्चासत्राला करिअर संसद पदाधिकारी, महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. पराग जोशी तसेच विविध क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते. मुख्यमंत्री आदेश मरापे यांच्या मार्गदर्शनाखाली करिअर संसदसाठी प्रभावी उपक्रम राबवण्यावर भर देण्यात आला.विद्यार्थ्यांसाठी करिअर संसदचे महत्त्व मुख्यमंत्री आदेश मरापे यांनी विद्यार्थ्यांना व्यावसायिक जगतातील संधींबद्दल जागरूक करणे, शासकीय व खाजगी क्षेत्रात कौशल्यविकास प्रशिक्षण उपलब्ध करून देणे, तसेच स्वयंरोजगारास प्रोत्साहन देणे यावर भर दिला.त्यांच्या निर्देशानुसार, महाविद्यालयात पुढील उपक्रम निश्चित करण्यात आले – करिअर मार्गदर्शन सत्रे – सरकारी व खासगी नोकऱ्यांची संधी, पात्रता व तयारीबाबत माहिती. उद्योजकता विकास कार्यशाळा – स्टार्टअप, स्वयंरोजगार आणि नवीन व्यवसाय संधींविषयी मार्गदर्शन.

इंटर्नशिप व प्लेसमेंट ड्राइव्ह – नामांकित कंपन्यांसोबत सहकार्य करून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी. कौशल्यविकास प्रशिक्षण – संवाद कौशल्य, संगणक प्रशिक्षण, नेतृत्वगुण विकास आणि विविध तांत्रिक कौशल्ये.
करिअर संसद उपक्रमांची अंमलबजावणी महाविद्यालयात (Dhanwate National College ) करिअर संसद प्रभावीपणे राबवण्यासाठी एक विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे –प्रथम टप्पा (पहिले ३ महिने)समिती स्थापन करून विद्यार्थ्यांची नोंदणी करणे.
करिअर मार्गदर्शन व कौशल्यविकास सत्रांचे आयोजन. द्वितीय टप्पा (३ ते ६ महिने)
प्लेसमेंट ड्राइव्ह आणि इंटर्नशिप उपक्रम राबवणे.

उद्योजकता व स्वयंरोजगार प्रशिक्षण देणे.तृतीय टप्पा (६ ते १२ महिने)विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेणे.यशस्वी विद्यार्थ्यांचे अनुभव आणि करिअर विकास कथा प्रसारित करणे.या चर्चासत्रात मुख्यमंत्री आदेश मरापे, सामान्य प्रशासन मंत्री स्वाती भारती, कौशल्य विकास मंत्री अनन्या वासनिक, नियोजन मंत्री तनु हिंगणकर, कायदे व शिष्टपालन मंत्री खुशाली मेश्राम माहिती व प्रसारण मंत्री सुमित ठाकरे तसेच संपूर्ण मंत्रीमंडळ उपस्थित होते.करिअर संसद उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरची स्पष्ट दिशा मिळावी, आवश्यक कौशल्ये आत्मसात करता यावीत आणि रोजगारक्षम बनता यावे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये अशा उपक्रमांच्या अंमलबजावणीमुळे विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी उपलब्ध होणार आहेत.

Dhanwate National College Fees structure
Dhanwate national college nagpur fees structure
Dhanwate national college nagpur contact number
Dhanwate national college nagpur fees
Dhanwate national college, Nagpur address
Dhanwate national college uniform
Dhanwate national college nagpur courses
Dhanwate National College MBA Fees structure

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles