नवी दिल्ली (New Delhi) :- बजेट सत्राच्या पहिल्या दिवशी संसदेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक सर्व्हेक्षण सादर केले. उद्या 23 जुलै रोजी निर्मला सीतारमण देशाचा अर्थसंकल्प जाहीर करतील. या पार्श्वभूमीवर संसदेत इकोनॉमिक सर्व्हे (Economic survey) सादर करण्यात आला. त्यानुसार 2023-24 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत 9.7 टक्क्यांची वाढ दिसत असल्याचा दावा सरकारनं केलाय. या आधीच्या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेची वाढ 7 टक्के इतकी होती. या तुलनेत महागाई थोडीफार वाढली आहे. पण सर्व कॅटेगरी एकत्र पाहिल्या तर महागाई नियंत्रणात असल्याचा दावा केंद्र सरकारकडून करण्यात आला आहे.
अर्थ मंत्रालयाचा इकोनॉमिक अफेयर्स विभागाअंतर्गत येणारे इकोनॉमिक डिव्हिजन आर्थिक सर्व्हे तयार करते. मुख्य आर्थिक सल्लागारांच्या देखरेखीखाली हा सर्व्हे तयार केला जातो.1950-51 मध्ये पहिला आर्थिक सर्व्हे सादर करण्यात आला होता.1664 पर्यंत बजेटसोबतच आर्थिक सर्व्हे सादर केला जायचा. यानंतर यात बदल करण्यात आला. अर्थसंकल्पाच्या 1 दिवस आधी आर्थिक सर्व्हे सादर करण्यात येऊ लागला. (Budget) आर्थिक सर्व्हेमध्ये गेल्यावर्षीचा लेखाजोखा आणि येणाऱ्या वर्षात अर्थव्यवस्थेसाठी लागणाऱ्या सुचनांचा यात समावेश असतो.