Sunday, August 10, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न उधळला, जवान जखमी

 

जम्मू(Jammu) 23 जुलै:- जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात आज, मंगळवारी पहाटे सैन्याने नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. यावेळी झालेल्या चकमकीत लष्कराचा एक जवान जखमी झाला आहे. यासंदर्भात माहिती देताना व्हाईट नाइट कॉर्प्सने सांगितले की सतर्क सैन्याने पहाटे 3 वाजता बटाल सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांवर प्रभावीपणे गोळीबार करून घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला.

जोरदार गोळीबारात एक जवान जखमी झाला आहे. जिहादी दहशतवाद्यांच्या एका गटाने कृष्णा घाटी सेक्टरच्या बटाल फॉरवर्ड भागात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला पण सतर्क जवानांना त्यांच्या हालचाली जाणवल्या आणि त्यांनी तत्काळ कारवाई सुरू केली. जवानांनी जोरदार गोळीबार करून दहशतवाद्यांना मागे हटण्यास भाग पाडले, मात्र यादरम्यान एक जवान जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दहशतवाद्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान या चकमकीनंतर सैन्याने या परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles