Saturday, June 21, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

विरोधक विखुरल्याने भाजपला फायदा | lokvahini News | लोकवाहिनी | Marathi News

16 Apr 2024

महाराष्ट्रातील नागपूर लोकसभा जागेसाठी १९ एप्रिलला मतदान होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथून दोनदा निवडणूक जिंकली असून ते तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. लढत काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्याशी आहे. विकास ठाकरे हे नागपूर पश्चिमचे आमदार असून ते महापौर राहिले आहेत. गडकरींच्या विजयासाठी RSS च्या 36 संघटना मैदानात उतरल्या असून, विरोधक विखुरल्याने भाजपला फायदा होईल, असे चित्र आहे. अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना पकडण्यात आले आहे. सोमवारी रात्री उशिरा मुंबई गुन्हे शाखेने दोघांना गुजरातमधील भुज येथून अटक केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते भुजच्या मंदिरात लपल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. विकी साहेब गुप्ता आणि सागर श्रीजोगेंद्र पाल अशी त्यांची नावे असून ते बिहारचे रहिवासी आहेत. पोलिसांनी त्यांना मुंबईच्या फोर्ट कोर्टात नेले आहे. काही वेळात सुनावणी होईल. पोलिसांनी सांगितले की, दोन्ही आरोपींनी ज्या पिस्तूलने गोळीबार केला होता ते सुरतच्या नदीत फेकले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शहरातील वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करणार, ट्राफिक जामच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार, अशी सोशल मीडिया पोस्ट काँग्रेसचे नागपूर लोकसभा उमेदवार विकास ठाकरे यांनी केली आहे. ‘नो हॉर्न सिटी’ म्हणून नागपूरला ओळख मिळवून देणार, आपली बस सेवेत आमुलाग्र बदल घडवून आणत १००% ग्रीन बस सेवा सुरु करणार, असे आश्वासन निवडणुकीच्या निमीत्ताने त्यांनी दिले आहे. व्याघ्र संवर्धन स्थानांतरणाच्या उपक्रमाअंतर्गत नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील नागझिरा अभयारण्याच्या गाभा क्षेत्रात दुसऱ्या टप्प्यात ११ एप्रिल रोजी एका वाघिणीला निसर्गमुक्त करण्यात आले. त्या नंतर तीनच दिवसात या वाघिणीचा सॅटेलाईट जीपीएस कॉलर एका ठिकाणी मिळून आल्याने चिंता व्यक्त केली जात होती. मात्र १५ एप्रिल रोजी या वाघिणीला बेशुद्ध करून परत सॅटेलाईट जीपीएस कॉलर बसवण्यात आली.\ अमरावती जिल्ह्यातील बुधवारा परिसरातील रहिवाशी शिवा चिन्ना गौर यांच्या घरी घरगुती सिलिंडरमधून गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात चार चिमुकल्यांसह एकूण ९ जण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी १५ एप्रिलला दुपारी बाराच्या सुमारास शहरातील बुधवारा येथे घडली. घटनेनंतर जखमींना अंजनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ऐन उन्हाळ्यात राज्यात अवकाळीचा तडाखा पाहायला मिळत आहे. आता आणखी चार दिवस विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यातच दुसरीकडे कोकण, ठाणे, मुंबईत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात कुठे ऊन तर कुठे पाऊस अशी स्थिती पाहायला मिळणार आहे. तापमानात देखील मोठी वाढ झाली असून, राज्यातील कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली आहे. मागील 24 तासात सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे 41 अंश इतक नोंदवण्यात आलं. नागपूरत देखील कमाल तापमान जवळजवळ 38 अंश इतक नोंदवण्यात आ Top searches | police bharti new update maharashtra | lakshyavedh current affairs | unique academy pune current affairs | deva jadhav current affairs | new marathi motivational speech | loksatta marathi newspaper analysis today | marathi new song ajay atul | marathi paramparik recipes | marathi movie | marathi lavani dance performance | mpsc rajyaseva update today | madhukar koti comedy | Nagpur News in Marathi | Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Ayodhya Ram Mandir | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | | Maratha Reservation Vidhan Sabha Special Session | Manoj Jarange | Eknath ShindeMaharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | Tajya Batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi | Maharashtra Maratha Protest LIVE | Maratha Aarakshan | maratha reservation | Maratha Morcha | Jalna Lathicharge | Marathi News | India Alliance | lokvahini News | लोकवाहिनी | Marathi News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles