Saturday, June 21, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

भाजपला बहुमत मिळणार नाही.

रजकीय विश्लेषकाची पोस्ट व्हायरल

  1. सध्या लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा सोमवारी पार पडत आहे. दरम्यान, राजकीय विश्लेषकांनी आपापले आडाखे मांडायला सुरुवात केली असून त्यातील एक विश्लेषण सध्या भलतंच व्हायरल होत आहे. या विश्लेषणानुसार भाजप आणि एनडीएला गेल्या निवडणुकीत मिळालेल्या जागांच्या तुलनेने यंदा किती जागा मिळतील, ते सांगण्यात आलं आहे.भाजपला आणि पर्यायाने एनडीएला यंदाच्या निवडणुकीत बहुमत मिळणार नसल्याचा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.

रजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी त्यांच्या अधिकृत एक्स पोस्टवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी सध्याच्या लोकसभा निवडणुकीचं विश्लेषण केलं आहे. या विश्लेषणामध्ये भारतीय जनता पक्ष व एनडीएला 2019च्या निवडणुकीत किती जागा मिळाल्या आणि यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या पदरात किती मतं पडतील, यासंदर्भात त्यांनी भाकित वर्तवलं आहे. त्यात यादव यांनी भाजपला किंवा एनडीएलाही बहुमत मिळणार नसल्याचा अंदाज वर्तवला आहे.भाजपला आणि पर्यायाने एनडीएला यंदाच्या निवडणुकीत बहुमत मिळणार नसल्याचा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles