Maharashtra Legislative Assembly Winter Session 2024
मुंबई (Mumbai) :- विधिमंडळाचे यंदाचे हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान नागपुरात झाले. या अधिवेशनात नव्याने निवडून आलेले 78 सदस्य सहभागी झाले होते. नवीन सदस्यांसह इतर सदस्यांनी कामकाजात सहभाग घेतला. पुढील अधिवेशन 3 मार्च 2025 रोजी मुंबईत घेण्यात येईल, अशी घोषणा विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. विधानसभेचे कामकाज 46 तास 26 मिनिटे तर, विधान परिषदेचे 36 तास काम झाले. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काही महत्वाच्या घोषणा केल्या. तर विधानसभा आणि विधानपरिषद सभागृहात एकूण 17 विधेयके मंजूर झाली. तसेच हिवाळी अधिवेशनाचं कामकाज संपल्यानंतर खातेवाटपाची यादी जाहीर करण्यात आली.
– विदर्भातील 110 सिंचन प्रकल्पांना मंजुरी, 61 कामे पूर्ण
– विदर्भात वैनगंगा-पैनगंगा- नळगंगा नदीजोड योजनेची निविदा जारी, 10 लाख हेक्टरचे सिंचन होणार, या योजनेत 550 किलोमीटरची नवीन नदी विकसित होणार
– अमरावतीच्या टेक्स्टाईल पार्कमध्ये 10 हजार कोटींची गुंतवणूक होणार
– गोसी खुर्द सिंचन प्रकल्प पुढील वर्षी पूर्ण करणार, जल आणि वन पर्यटनाच्या आंतरराष्ट्रीय सुविधा तेथे उभारणार
– मराठवाडा वॉटर ग्रीड साकार होणार
– ग्रीनफिल्ड
– गडचिरोलीत विमानतळ साकारणार
– धान उत्पादक शेतकऱ्यांना यंदाही 20 हजार रुपये बोनस मिळणार
– पिक विमा कंपन्यांच्या गैर प्रकारांची सखोल चौकशी
– मुंबई गोवा महामार्ग प्रकल्पाचे काम सुरू असून हा महामार्ग पूर्ण होईल