भंडारा, २७ मे, : रोजगार हमी योजनेच्या कामावर बोगस मजूर दाखवून शासनाचे पैसे लाटण्याचा प्रकार तुमसर तालुक्यातील खैरलांजी येथे उघडकीस आला आहे. ग्रामपंचायत सदस्या यांना माहिती होताच खंडविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असुन दोषी रोजगार सेवकावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
भंडारा जिल्ह्यात सद्या रोजगार हमीची कामे सुरू आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना उन्हाळ्याच्या दिवसात शेतीची कामे नसल्याने ग्रामीण भागात रोजगार राहत नाही. म्हणून शासनाच्या वतीने रोजगार हमीची कामे सुरू केली जातात. गावातच रोजगार उपलब्ध झाला तर नागरिकांचा पलायन थांबतो. मात्र, याच रोजगार हमीच्या कामाला गालबोट देखिल लागल्याचे आपण नेहमी ऐकत असतो. तुमसर तालुक्यातील खैरलांजी (Khairlanji in Tumsar Taluk)गावात पांदण रस्तचे काम सुरू करण्यात आले. गावातील मजूर याच कामावर जाऊ लागले मात्र रोजगार सेवकांनी आपल्याच ओळखीच्या नात्यातील 11 लोकांची बोगस हजेरी लावली. हे नागरीक कामावर आलेच नाही. मग त्यांचे नाव हजेरी बुक वर दिसून आलें. याची माहिती होताच गावातील नागरिकांनी खंडविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करत दोषींवर कारवाईची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
गावकऱ्यांनी बोगस मजुरांची हजेरी लावल्यामुळे रोजगार सेवकाची तक्रार तुमसर खंडविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. या विषयी खंडविकास अधिकारी यांना विचारले असताना त्यांनी कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला आहे. तर या विषयी चौकशी सुरु असल्याचे सांगितले. पण खंडविकास अधिकारी चौकशीच्या नावाखाली वेळकाढू पना करत असल्याचा आरोपी गावकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे योग्य चौकशी करून दोषी रोजगार सेवकाला पदमुक्त करावा, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.