पुणे(Pune)17 जुलै:- पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात रुई लीमटेक मार्गावर मंगळवारी दुपारी 4 वाजता कारचा टायर फुटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात इंदापूरमधील काँग्रेस नेत्याच्या 22 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. आदित्य आबासाहेब निंबाळकर असे मृतकाचे नावआहे.आदित्य हा काटेवाडीकडून रुई मार्गे बारामतीत येत होता. त्याच्या कारचा अचानक टायर फुटला आणि कार पलटी झाली. ही कार एका इमारतीच्या कडेला जाऊन आदळली.
या अपघातात आदित्य निंबाळकर (Aditya Nimbalkar) गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत, आदित्यला गाडीतून बाहेर काढले. जखमी आदित्यला स्थानिक रुग्णालयात तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण, अपघातात त्याला झालेली दुखापत खूपच गंभीर होती. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इंदापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर यांचा मुलगा आदित्य आबासाहेब निंबाळकर काटेवाडीकडून रुई मार्गे बारामतीत येत होता. त्याच्या चारचाकी गाडीचा टायर फुटला आणि महामार्गावर गाडी पलटी झाली. त्यानंतर कार एका इमारतीच्या कडेला जाऊन आदळली.