Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

सैफ हल्ला प्रकरणी बांगलादेशी घुसखोराला अटक

आरोपी बांगलादेशी घुसखोर असल्याची माहिती

मुंबई (Mumbai) 19 जानेवारी :- अभिनेता सैफ अली खानवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी ठाणे येथून अटक केली आहे. आरोपीचे नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असे आहे. तो गेल्या 8 महिन्यांपासून अवैधपणे भारतात वास्तव्याला होता अशी माहिती मुंबई पोलिसांनी आज, रविवारी सकाळी पत्रकार परिषदेत दिली.

यासंदर्भात पोलिसांनी सांगितले की, आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याला शनिवारी मध्यरात्री उशिरा ठाणे येथील हिरानंदानी इस्टेट येथे सुरू असलेल्या मेट्रो बांधकामाजवळील कामगार छावणीतून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीने 16 जानेवारीला सैफ अली खानच्या घरात घुसून चाकू हल्ला केल्याची कबुली दिली आहे. अवैध बांगलादेशी घुसखोर असलेला शहजाद एका रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम करत होता आणि त्याने विजय दास, बिजॉय दास, बीजे आणि मोहम्मद इलियास अशी अनेक नावे वापरली होती. आरोपी ठाण्यात वेगवेगळ्या ठिकाणी काम करत होता. अटकेच्या काही दिवस आधी तो एका कंत्राटदाराबरोबर बांधकाम स्थळावर काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर, आरोपी सतत बातम्यांचे चॅनेल पाहत होता असं पोलिसांनी सांगितले. तसेच अटकेच्या भीतीने त्याने आपला फोनही बंद केला होता.मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद

गुरुवारी पहाटे 2 ते 2.30 च्या सुमारास सैफ अली खानच्या राहत्या घराच्या 11 व्या मजल्यावर शिरला. यावेळी सैफने आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी या हल्लेखोराचा सामना केला. सैफवर चाकूचे 6 वार करण्यात आले याशिवाय अभिनेत्याच्या घरातील मदतनीस सुद्धा यात जखमी झाली होती. रक्तबंबाळ अवस्थेत सैफला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लीलावती रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांच्या मते, सैफची प्रकृती स्थिर असून त्याच्या जीवाला कोणताही धोका नाही.

याप्रकरणी मुंबई पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतले होते. एका आरोपीला संशयावरून छत्तीसगडच्या दुर्ग येथून अटक केली होती. परंतु, चौकशीनंतर त्याचा या घटनेशी संबंध नसल्याचे लक्षात आल्यावर सोडून देण्यात आले होते. आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याने सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आपला मोबाईल स्वीच ऑफ केला होता. त्यानंतर दादर रेल्वे स्टेशनवर त्याने फोनवरून कुणाशी तरी संभाषण केले आणि पुन्हा फोन बंद केला. तसेच ठाण्यात गेल्यावर आणखी एकदा कॉल करून फोन बंद केला. यावरून पोलिसांनी आरोपीचा शोध घेतल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान पोलिस आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेले असून त्यानंतर त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे.

Mumbai City
Mumbai map
Mumbai population
Mumbai Chart
Mumbai district Name
Where is Mumbai located in India
Flights to Mumbai
Mumbai city name list

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles