मुंबई, २४ मे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे यंदाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.यंदाच्या वर्षी १४ जून रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, मनमाला टॅक रोड, मांटुगा -माहीम, मुंबई येथे सायंकाळी ४ वाजता पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.कलावंत व नाट्य रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन अभिनेते प्रशांत दामले यांनी केले आहे.