Thursday, June 19, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

वृद्धाश्रमातील ८२ वर्षीय नागरिकाने मुख्यमंत्र्यांकडे सोपवली २० लाखांची देणगी

समाजात स्वत:च्या आधी इतरांचा विचार करणारे लोक वेळोवेळी पाहायला मिळतात. आपल्या आजूबाजूला देखील अशी अनेक मंडळी आहेत जी सामाजिक भान जपण्याची एकही संधी सोडत नाहीत. असाच एक मानवतेचे उदाहरण घालून देणारा प्रसंग नुकताच समोर आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट करत यासंबंधी माहिती दिली आहे. नेरूळच्या आनंद वृद्धाश्रमात राहणारे ८२ वर्षीय सदानंद विष्णु करंदीकर यांनी कर्करोगग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी तब्बल २० लाख रुपयांची देणगी दिली आहे. मुख्यमंत्र्‍यांनी देखील याचे वर्णन ‘दुःखातून निर्माण होणार्‍या करुणेचे मूर्तीमंत उदाहरण!’ अशा शब्दात केले आहे.

सदानंद करंदीकर हे सेवा निवृत्त झाले आहेत. त्यांना अपत्य नसल्याने ते सध्या नेरुळ येथील आनंद वृद्धाश्रमात राहात आहेत. गेल्या वर्षी त्यांच्या पत्नी सुमती करंदीकर यांचे कर्करोगाने निधन झाले. या काळात त्यांनी कर्करोग झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची पैशांच्या कमतरतेमुळे होणारी धावपळ पाहीली आणि यानंतर त्यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रत्येकी १० लाख म्हणजे एकूण २० लाख रुपयांची देणगी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या देणगीचा धनादेश सोपवतानाचा फोटो देखील पोस्ट केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles