ओबीसींच्या मागण्यांचे 30 ठराव मंजूर करणार
अमृतसरमध्ये (Amritsar) राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं राष्ट्रीय महाअधिवेशन पार पडत आहे. ओबीसींच्या मागण्यांचे 30 ठराव अधिवेशनात मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नववे राष्ट्रीय अधिवेशन आज 7 ऑगस्टला पंजाबमधील अमृतसरच्या गुरू नानक देव विद्यापीठाच्या गोल्डन ज्युबिली कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना, ओबीसी क्रिमिलेअर मर्यादावाढ, स्वतंत्र ओबीसी मंत्रालय, (National Convention) आरक्षणासाठी 50 टक्क्यांची अट रद्द करा यासह समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने मंथन होईल. समारोपीय सत्रात या अनुषंगाने ठरावही पारित केले जाणार आहेत.
देशात जातनिहाय जनगणना करून आकडेवारी प्रसिद्ध करावी, स्थानिक स्वराज्य संस्थेत 27 टक्के आरक्षण मिळत होते. मात्र आता हे आरक्षण कमी झाले आहे,ते लोकसंख्येच्या आधारावर सरकारने मिळायला पाहिजे. ओबीसींची (OBC) संख्या 60 टक्के आहे, यासाठी केंद्र सरकारमध्ये ओबीसी मंत्रालय सुरू करावे, अशा अनेक मागण्या या ठरावाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या महाअधिवेशनात राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर,आमदार परिणय फुके, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार अभिजित वंजारी, महादेव जाणकार इत्यादि अनेक राजकीय नेतेही या अधिवेशनस्थळी दाखल झाले आहेत.