मुंबई (Mumbai):- राज्यातील दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. यानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी गुलाब देत त्यांना शुभेच्छा दिल्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारयांचा (Ajit Pawar) ६५ वा वाढदिवस साजरा करत आहे. अजितदादा त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी घरी राहून हारतुरे न स्वीकारत न बसता अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. अजित पवार यांच्यावर आज सकाळपासूनच वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र, आज घरातून बाहेर पडण्यापूर्वी अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी अजितदादांना गुलाबाचे फुल दिले. हेच फूल जॅकेटवर लावून अजित पवार नगरच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत.
आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचाही वाढदिवस आहे. त्यांचे अभिनंदन करताना अजित पवार यांनी लिहिले, “माझे सहकारी, मित्र आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुमच्या दीर्घायुष्यासाठी मी प्रार्थना करतो.”