विराट कोहलीने साधला हिटमॅनशी संवाद;
रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने इंग्लंडचा पराभव करत २०२२ च्या उपांत्य फेरीतील पराभवाचा मोठा बदला घेतला. भारताने इंग्लंडचा ६८ धावांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.
इंग्लंडविरुद्धच्या या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) भावूक झाला. रोहित ड्रेसिंग रूमबाहेर एकटाच बसला होता. विराट कोहली(Virat Kohli) हात मिळवायला जाताच रोहितने हात डोळ्यावर घेतले आणि विराट त्याच्याशी काहीतरी बोलताना दिसला. रोहितचा ड्रेसिंग रूमबाहेरील हा फोटो आणि व्हीडिओ व्हायरल होत आहे.
टीम इंडियाने 20 ते 25 धावा जास्त केल्या. पिच हे खूप आव्हानात्मक होतं पण टीम इंडियाने दर्जेदार खेळ केला त्यामुळे विजयासाठी पात्र आहेत. 2022 आणि आताची परिस्थिती खूप वेगळी होती. पाऊस असल्याने आम्ही जास्त काही बदल केले नाहीत. टॉस जिंकला किंवा हरल्याने जास्त काही फरक पडत नाही. जर आपण पाहिलं तर टीम इंडियाकडे खूप चांगले स्पिनर आहेत. आम्ही एकजुटीने संपूर्ण स्पर्धेत खेळलो पण आज आम्ही थोडे कमी पडलोत. मात्र टीममधील प्रत्येकाने केलेल्या प्रयत्नाचा मला अभिमान असल्याचं जोस बटलर म्हणाला.