पुणे(Pune)25 जुलै :- राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या पुण्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरू झाली आहे. दरम्यान, आजही पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचे संकेत आहेत. मुसळधार पावसामुळे आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पुण्यातील परिस्थिती पाहून महाराष्ट्राच्या उच्च माध्यमिक मंडळाची इयत्ता बारावीची पुनर्परीक्षा होणार आहे. याविषयीची माहिती खासदार मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी दिली आहे.
खासदार मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट करत या संबंधी माहिती दिली. याविषयी माहिती देताना त्यांनी,” महाराष्ट्राच्या उच्च माध्यमिक मंडळाची इयत्ता बारावीची पुनर्परीक्षा होत आहेत. तर सध्या सुरु असून राज्यभरातील पावसाची एकूण परिस्थिती लक्षात घेता आज काही परिक्षार्थी परीक्षेसाठी पोहोचू शकणार नाहीत, ही अडचण आपण महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दीपक केसकर जी यांना सांगितली. यावर त्यांनी जे परिक्षार्थी आजच्या पेपरसाठी पोहोचू शकणार नाहीत, अशा परिक्षार्थींसाठी पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पुण्यासह राज्यभरासाठी असणार आहे.” अशी माहिती त्यांनी दिली.