बांगलादेशात हिस्सा मासे प्रसिद्ध आहेत. दुर्गा पूजा दरम्यान या माशांचे व्यंजन बनवले जातात. शेख हसीना सरकार हिला सद्भावना नीती मानत होता. 2023 मध्ये दुर्गा पूजा दरम्यान बांगलादेशात भारताने 5000 टन हिल्सा माशांची निर्यात केली होती. बांगलादेशमध्ये (Bangladesh) झालेल्या बंडानंतर शेख हसीन यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी नोबेल विजेते मोहम्मद युनूस यांची नियुक्ती झाली. परंतु मोहम्मद युनूस सातत्याने भारताविरोधी निर्णय घेत आहेत. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोहम्मद युनूस यांना एक झटका दिला आहे. त्यानंतर मोहम्मद युनूस वठणीवर आले आहेत. त्यांनी आपला निर्णय मागे फिरवत भारतातून होणाऱ्या हिल्सा माशांच्या निर्णयातील परवानगी दिली आहे
काही दिवसांपूर्वी मोहम्मद युनूस यांनी भारतातून होणाऱ्या हिस्सा माशांची निर्यात बंद करण्याचे आदेश काढले. त्यानंतर भारताने बांगलादेशची राजकीय कोंडी सुरु केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्राच्या बैठकीसाठी अमेरिका दौऱ्यावर आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस अमेरिकेत आहे. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी मोहम्मद युनूसची भेट टाळली आहे. बांगलादेशकडून घेण्यात येणाऱ्या भारतविरोधी धोरणामुळे ही भेट टाळली. बांगलादेशला त्याची जाणीव होताच बंदी घातलेली हिस्सा माशांच्या निर्यातीला परवानगी दिली आहे.
बांगलादेशात हिस्सा मासे प्रसिद्ध आहेत. दुर्गा पूजा दरम्यान या माशांचे व्यंजन बनवले जातात. शेख हसीना सरकार हिला सद्भावना नीती मानत होता. 2023 मध्ये दुर्गा पूजा दरम्यान बांगलादेशात भारताने 5000 टन हिल्सा माशांची निर्यात केली होती. या वर्षी युनूस (Mohammed Yunus) सरकाने आता 3,000 टन हिल्सा माशांच्या निर्यातीस परवानगी दिली आहे.