Thursday, July 31, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

हिंदीच्या निर्णयावरील तुफान टीकेनंतर घेतला मोठा निर्णय!

हिंदी भाषेबाबत घेतलेल्या निर्णयानंतर राज्य सरकारवर तुफान टीका झाली. त्यानंतर आता टीकेची झोड उठल्यानंतर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. हिंदी भाषा ही बंधनकारक नसेल, असे सरकारने आता स्पष्ट केले आहे. खुद्द शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनीच याबाबतची घोषणा केलीआहे.

हिंदी भाषेच्या वापरासंदर्भातील निर्णयात सरकारने अनिर्वाय हा शब्द वापरला होता. याच कारणामुळे सरकारवर टीका झाली होती. आता सरकारने याच हिंदी वापरच्या निर्णयाबाबतनवा निर्णय घेतला आहे. त्याची माहिती दादा भुसे (Dada Bhuse) यांनी दिली. हिंदी भाषेच्या वापरासाठी आम्ही अनिवार्य हा शब्द वापरला होता. आता या शब्दाला शासन स्थगिती देत आहे. हिंदी भाषा ही बंधनकारक असणार नाही, अशी घोषणा दादा भुसे यांनी केली आहे.

16 एप्रिल रोजी जो शासन निर्णय जारी झाला त्यात मराठी भाषा विषय तसाच राहणार आहे. मराठी भाषेला प्राधान्य राहील. इंग्रजी दुसरा विषय असेल. तर तिसरा विषय हिंदी भाषा असेल. हिंदी विषय केंद्र सरकारने बंधनकारक केलेला नाही. सुकाणू समितीने तृतीय भाषा हिंदी विषय स्वीकराला आहे. शासन निर्णयामध्ये हिंदी भाषा अनिवार्य असेल असा शब्द वापरला गेला. त्यामुळे प्रश्न निर्माण झाला. हिंदी सोडून जर दुसरी भाषा शिकायचं ठरलं तर शिक्षकसुद्धा बदलावे लागतील. त्यासाठी धोरण ठरावावं लागेल, अशी माहिती दादा भुसे यांनी दिली.

तसेच. आताच्या घडीला हिंदी विषय ऐच्छिक ठेवणार आहोत. इतर विषयासंदर्भात आपण निर्णय घेऊ. जे विद्यार्थी हिंदी भाषेसाठी इच्चुक असतील त्यांना मराठी, इंग्रजीसोबत हिंदी विषय शिकवला जाईल. या संदर्भातला शासन निर्णय यथावकाश निर्गमित केला जाईल, असेही दादा भुसे यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles