गोदिया, २५ मे , : दारूच्या नशेत करण्यात आलेली शिवीगाळ तरुणाच्या जीवावर बेतली आहे. क्षुल्लक कारणातून चाकूने भोसकून मित्राचा खून करणाऱ्या आरोपीला गोंदिया पोलिसांनी अटक केली आहे.
राहुलचा खून केल्यानंतर आरोपी प्रतीक पसार झाला होता. त्याच्या शोधासाठी शहर पोलिस ठाण्यातील तीन पथके तर स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके अशी पाच पथके तयार करण्यात आली. पथकाकडून प्रतीकची मित्रमंडळी व नातेवाइकांकडे शोध घेण्यात आला. शिवाय पथक भंडारा, नागपूर, बालाघाट येथे रवाना करण्यात आले होते. पथकांकडून अथक प्रयत्न करून व मोठ्या शिताफीने प्रतीक भोयर याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.